इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- जि.प.उस्मानाबाद अंतर्गत लोहारा तालुक्यातील जेवळी येथील बसवेश्वर मा.विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत तालुक्यातील कास्ती बु.येथील जि.प.के.प्रा.शाळेने घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धा खो - खो, कब्बड्डी,100 मी,200 मी धावणे,गोळाफेक,उंच उडी,लांब उडी,अदिंच्या घेण्यात आल्या.या मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी केंद्र स्तरावर क्रमांक मिळवून तालुका स्तरावर सहा केंद्रातून विजयी संघानी सहभाग घेतला होता.यामध्ये खो - खो व कब्बड्डी या क्रीडा स्पर्धेत जि.प.कें.प्रा.शाळा कास्ती बु च्या मुलींच्या संघाने सर्व प्रथम क्रमांक मिळवला.व तसेच याच शाळेतील कु.आकांक्षा पाटील लांब उडी व 200 मी धावणे या क्रीडा प्रकारात सर्व प्रथम क्रमांक मिळला.व कु.परशुराम दंडगूले याने 100 मी धावणे यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.तर पल्लवी रवले गोळाफेक प्रथम क्रमांक व गीता चव्हाण 100 मी धावणे सर्व प्रथम क्रमांक मिळला.रिले धावणे क्रीडा प्रकारात मुलींचा संघ प्रथम,मुलाचा संघ द्वितीय क्रमांक मिळला.या संघास प्रवीण अगम्बरे,नितीन कदम सर यांना मार्गदर्शन केले.या यशाबदल खेळाडूचे व मार्गदर्शकाचे शाळेचे मुख्याध्यापक एम.एन.चंदनशिवे, के.एस.गायकवाड,यांच्यासह सर्व शिक्षकानी अभिनंदन व कौतुक केले.
