महामार्गावर डिझेल वाहुन नेणारा टॅकर पलटी


बोरगाव मंजू :- राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  अनभोरा नजीक  डिझेल व पेट्रोल वाहुन नेणारा टॅकर पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार अकोला कडून मुर्तीजापुर कडे डिझेल व पेट्रोल  वाहुन नेणारा टॅकर क्रमांक एम. एच. 27 सी . 840 हा जात होता. चालकाचे नियंत्रण सुटून  सदर  टॅकर  रोडच्या साईटवरील खड्ड्यात पलटी झाला. दरम्यान या अपघातात टॅकर चालक, क्लिनर किरकोळ जखमी झाले. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर मुर्तीजापुर शहर ठानेदार डी. के. आव्हाडे , बोरगाव मंजू पोलीस ठाणेदार विजय मगर सह बोरगाव मंजू व मुर्तीजापुर ग्रामीण व शहर पोलीस दाखल झाले. दरम्यान  मुर्तीजापुर  अग्निशामक दलास पाचारण केले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळावर तळ ठोकून होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post