इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत
शिक्षकांनी व शिक्षेकेनी इ लर्निंग कक्ष व 9 डिजिटल वर्ग लोकसहभागातुन सुरु केले आहे.
या शाळेतील शिक्षक व शिक्षेकांचा व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा लोहारा जि.प.के.प्रा.शाळेत ग्रामस्थांच्यावतीने दि.26 ऑक्टोंबर रोजी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मधुकर रोडगे होते.तर प्रमुख म्हणुन माजी मुख्याध्याुक टि.के.
मक्तेदार,शरणप्पा जट्टे सर,मुख्याध्यापक मदन कुलकर्णी,सुर्यकांत पांढरे,राजेंद्र माळवदकर,
दिनकरराव कुलकर्णी,व्यंकट पोतदार,विकास घोडके, नितीन वाघमारे,जिल्हा मराठी पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,पत्रकार निळकंठ कांबळे,गिरीश भगत,अदि उपस्थित होते.
यावेळी सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी लोकसहभागातुन इ लर्निंग कक्ष व डिजिटल वर्ग सुरु करण्यात आलेले शिक्षक व तालुकास्तरीय आदर्श पुरस्कार मिळविलेले शिक्षक डी.एम.फावडे,
टी.एफ.दबडे,पी.एन.शिंदे,एस.जी.माळवदकर,
जयरुद्दीन शेख,श्रीमती एम.टी.शिंदे,श्रीमती व्ही.के. चौधरी,श्रीमती एस.एम.निर्मळे,श्रीमती एस.आर. कांबळे,श्रीमती नेहा भंडारे,श्रीमती जी.डी.पाटील,
अदिं शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी तानाजी दबडे,श्रीमती व्ही.के.चौधरी,श्रीमती जी.डी.पाटील,सुर्यकांत पांढरे,दत्तात्रय फावडे,मुख्याध्यापक मधुकर रोडगे यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विकास घोडके यांनी केेले तर सुत्रसंचालन व आभार आनंत कदम यांनी मानले.या कार्यक्रमास सुधीर घोडके,अमोल जट्टे,सुदाम माळी,सुरेश वाघमोडे,प्रताप साळुंके, बालाजी यादव,यांच्यासह शिक्षक,शिक्षीका,नगरीक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
