यवतमाळ :- जिल्हा भारतीय जनता पार्टीचया समस्त कार्यकर्ते,पदाधिका-यांनी, सक्रीय होऊन आपापल्या जबाबदा-या पार पाडा असे आवाहन बैठकीत जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी केले. स्थानिक बालकृष्ण मंगलम्मध्ये भाजपाचया जिल्हा बैठकीचे आयोजन केले होते, याप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिका-यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करताना डांगे म्हणाले, जिल्ह्यातील भाजपाचया सर्व सेल अंतर्गत कार्यकर्ते पदाधिका-यांनी सक्रीय होऊन जबाबदा-या पार पाडा, पद शोभेसाठी नसून,
पक्षहितासाठी बहाल केले जाते, त्यांचा पक्षाचे विविध कार्यक्रम,विविध विचार घरा-घरापर्यंत पोहचविणयासाठी उपयोग करावे असे त्यांनी आवर्जून सांगितले. या बैठकीला आ.प्रा.डाँ.अशोक उईके, आ.संजय बोदकुरवार,माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, मा.मंत्री संजय देशमुख, मा.आ.दिवाकर पांडे, उद्धवराव येरमे युवा मोर्चों चे जि.अध्यक्ष तारेंद्र बोर्डे,महादेव सुपारे,अरुण भिसे,सरचिटणीस अमोल
ढोणे,अँड.प्रफुल्लसिंह चौहान,राजू पडगिलवार,मायाताई शेरे, सुनिल समदूरकर,विजय घाडगे,दिलिप मादेश्वर,रघुवीरसिंह चौहान,प्रकाश भुमकाले,आकाश धुरट, राकेश मिश्रा,सुरज विश्वकर्मा, चिददरवार,फरहतखान,जयंत झाडे, निखिल चिददरवार यांचे सह जिल्ह्यातील बहुतांश तालुकयातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.