लहरीबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्य भागवत सप्ताह


कुरूम : श्री.परमहंस ब्रह्मानंद लहरीबाबा यांच्या ३९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्य संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह बुधवार दि.१० ते १७ ऑक्टोबर दरम्यान श्री.परमहंस लहरीबाबा संस्थान श्री.क्षेत्र मधापुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
           या भागवत कथेची वेळ दुपारी २ ते ६ असून कथा प्रवक्ता ह.भ.प.भागवताचार्य उमेश महाराज जाधव नांदगाव (खं) हे आपल्या मधुर वाणीतून कथा श्रवण करणार असून या कथेचे मुख्य यजमान ज्ञानेश्वर खलोरकर व सुनीता खलोरकर हे राहतील.या कार्यक्रमाचे आयोजन श्री. परमहंस लहरीबाबा संस्थान श्री क्षेत्र मधापुरीच्या वतीने करण्यात आले आहे.
        सप्ताह दरम्यान दैनंदिन कार्यक्रमात सकाळी लहरी बाबाच्या समाधीचे पूजन,सामूहिक ध्यान,कलश स्थापना व काकडा आरती,दररोज बाबांच्या पादुकांना अभिषेक,श्री.परमहंस लहरीबाबा लिलामृत ग्रंथाचे सामूहिक पारायण,दुपारी २ ते ६ श्रीमद भागवत कथा सायंकाळी सामूहिक प्रार्थना,हरिपाठ,
हरिकीर्तन पार पडेल.
       बुधवार दि.१० ऑक्टोबरला रात्री ९ ते ११ लहरी बाबा ढोलाचे भजन मंडळ मधापुरी यांचा भजनाचा कार्यक्रम,गुरूवार दि.११ऑक्टोबरला रात्री ९ ते ११ भक्ती संगीताचा कार्यक्रम,शुक्रवार दि.१२ ऑक्टोबरला ह.भ.प.निलेश महाराज चट्टे शिरखेड यांचे,शनिवार दि १३ ऑक्टोबरला ह.भ.प.उमेश महाराज जाधव (आळंदीकर) यांचे,रविवार दि.१४ ऑक्टोबरला ह.भ.प.नारायण महाराज पडोळे निंबी यांचे,सोमवार दि.१५ ऑक्टोबरला प.पु.स्वामी गजेंद्र महाराज,लहरीबाबा कृपाकित.लहरीबाबा संस्थान ,मंगळवार दि.१६ ऑक्टोबरला ह.भ.प.विष्णू महाराज अढाव काकनवाडा यांचे हरिकीर्तन होईल.सकाळी परमहंस लहरीबाबा लिलामृत ग्रंथाचे समापन, दुपारी श्रीमद भागवत कथा समापन,सायंकाळी श्री.लहरगीर महाराज वडगाव यांच्या पालखीचे आगमन,होम हवन संपन्न होईल.बुधवार दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता श्री.परमहंस लहरीबाबा मूर्तीची दिंड्यापताकासह रथातून भव्य मिरवणुक निघेल,सकाळी १० ते ११ या वेळेत प.पु.स्वामी गजेंद्र चैतन्य महाराज यांचे काल्याचे किर्तन प.पु.उमाळे आई,लक्ष्मी नगर,अमरावती यांचे प्रमुख उपस्थितीत होईल,दुपारी १ वाजता महाप्रसाद प्रारंभ होऊन,दुपारी ४ ते ५ या वेळेत श्री.बाबाला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल.
          तरी सप्ताहातील कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post