इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा,लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले व मराठवाडा पदविदर मतदार संघाचे आ.सतिश भाऊ चव्हाण,यांच्यासह दहा जणांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मराठवाडा सेवा प्रतिष्ठाण महाराष्ट्र यांच्यावतीने मराठवाडा भुषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कोथरुड पुणे येथे दि.16 ऑक्टाेंबर रोजी सांयकाळी साडेचार वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन समारोह कार्यक्रमा प्रसंगी करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रिय गृहमंत्री तथा माजी लोकसभा सभापती शिवराज पाटील चाकुरकर उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणुन आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,पालकमंत्री गिरीश भाऊ भापट (पुणे) तर प्रमुख म्हणुन खा.प्रा.रविंद्र गायकवाड (उस्मानाबाद), आ.साै.मेघाताई कुलकर्णी (पुणे),मेघराज राजभोसले (अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ), विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव,आ.बसवराज पाटील (औसा),माजी आ.विधान परिषद धोंडीराम राठोड,ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे,
एम.एम.नावंडे,एकनाथराव पवार, नगराध्यक्षा साै.वैजंता कांबळे (आळंदी),प्राचार्य भाऊसाहेब जाधव,प्राचार्य सुधाकर जाधवर,पत्रकार नाना काटे,
अदि,उपस्थित राहणार आहेत.
मराठवाडा सेवा प्रतिष्ठाण महाराष्ट्र यांच्यावतीने
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणारे योगीराज महाराज गोसावी पैठणकर(पैठण आौरंगाबाद) यांना धार्मिक,आ.सतिश भाऊ चव्हाण (औरंगाबाद) यांना शैक्षणिक,आ.ज्ञानराज धोंडीराम चौगुले,
(उमरगा,लोहारा जि.उस्मामाबाद) यांना राजकीय, राजेश धोंडीराम राठोड (जालना) यांना सामाजीक, कृष्णा केंडे (बिड) यांना पत्रकारीता,पराग चाैधरी;
(परभणी) यांना निवेदक,साक्षी आंधळे(बिड) यांना
युवा भुषण अभिनय,मोहन बाबुराव सुर्यवंशी (उस्मानाबाद) यांना उद्याेजक,कल्याणी देशपांडे जाेशी (औरंगाबाद) यांना गायन,डॉ.गणेश जाधव (जालना) यांना लोककला,असा मराठवाडा भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या सर्वांना मराठवाडा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहान मराठवाडा सेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष दिनकर ब.चाैधरी यांनी केले आहे.

