देशाला गतवैभव मिळवुन देने हाच रा.स्व.संघाचा विचार — शेषाद्री (अण्णा) डांगे


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- आज देशात सर्वच क्षेत्रात समर्पित लोक पाहीजेत,चांगले डॉक्टर,इंजिनीअर,शिक्षक,पत्रकार, शेतकरी,युवक यांची देशाला गरज आहे पण असे समर्पित भाव ठेऊन काम करणारे लोक फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घडवतो असे समर्पित व देश हिताप्रति जागरूक प्रशिक्षित कार्यकर्तेच देशाला पुन्हा वैभव निर्माण करून देतील असे वक्तव्य विद्याभारतीचे प्रांत उपाध्यक्ष शेषाद्री डांगे यांनी केले.
भारतीय जनता पार्टीने उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या पंडित दीनदयाळ प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख म्हणुन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नितिन काळे,प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड.मिलिंद पाटील, अँड.अनिल काळे,सुधाकर गुंड,अँड.व्यंकट गुंड, सतिशबप्पा देशमुख,प्रभाकर मुळे,कोंडप्पा कोरे, रामदास कोळगे,प्रदीप शिंदे,अँड.नितिन भोसले,
भाजप मिडिया विभाग जिल्हा अध्यक्ष धनजंय रणदिवे,तालुका अध्यक्ष दत्ता सोनटक्के,तालुका अध्यक्ष सत्यवान सुरवसे,तानाजी पाटील,शहराध्यक्ष संदीप कोकाटे,अदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना शेषाद्री (अण्णा) डांगे म्हणाले कि,संघपरिचय या विषयी अधिक बोलताना त्यांनी संघाची स्थापना गरज,उद्दिष्ट व कार्यपद्धतीची सविस्तर माहीती देऊन जो आपापल्या कार्यक्षेत्रात समर्पित भाव ठेऊन कार्य करतो देश व समाजाच्या हिताला प्राधान्य देतो असा प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक आहे,आणि संघ अशा व्यक्ती निर्मानासाठी अहोरात्र कार्यरत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाची सुरुवात पं.दीनदयाल उपाध्याय व भारतमातेचे पुजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या प्रशिक्षण शिबिरात भाजपा इतिहास आणि विकास या विषयावर जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,भाजपा सरकारच्या उपलब्धी या विषयावर प्रभाकर मुळे, निवडणुक व्यवस्थापन या विषयावर नितिन काळे, यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी अँड नितिन भोसले यांनी आभार मानले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृषाली वरुडकर, आशाताई लांडगे,पूजा देडे,पूजा राठोड,प्रविन कोळगे, प्रविण पाठक, देवदत्त गोरे,अतुल बागल,धनंजय  शिंगाडे, शिवाजी पंगुड़वाले,राहुल काकडे,बालाजी कोरे,योगेश जाधव, विस्तारक मकरंद पाटील,शिवाजी गिड्डे,गजानन नलावडे,गणेश मोरे,यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post