डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय,पाडोळी(आ.) येथे काळे सरांच्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप व शाळेस संगणक भेट


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पाडोळी(आ) येथे शाळेतील सहशिक्षक कै.काळे संतोष लक्ष्मण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त काळे परिवाराच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप व शाळेस संगणक भेट देण्यात आले.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड.व्यंकटराव गुंड,यावेळी प्रमुख म्हणुन माजी जि.प.उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरूजी),
उपसरपंच बाबुराव पुजारी,सुर्यकांत शिराळ(गुरूजी), सहदेव ढाकरे,आनंदराव तोडकरी,विठ्ठल वाघ,वैभव उमाटे,भाऊसाहेब हुबाले,अदि उपस्थित होते.
 यावेळी कै.काळे सर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी कै.काळे सर यांच्या पुण्यस्मरणार्थ काळे परिवाराच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करुन ‘एक संगणक संच’ भेट देण्यात आला.यावेळी शाळेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते काळे परिवाराचे शाल,श्रीफळ,हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेतील कु.गुंड अमृता,गुंड प्रणिता,चव्हाण प्रीती,कु.कदम पृथ्वीराज या विद्यार्थ्यांनी कै.काळे सरांप्रती असणारी कृतज्ञता आपल्या भाषणातून व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.जी.
सुर्यवंशी यांनी केले.तर आभार शेख सर यांनी मानले.
या कार्यक्रमास आनंद तोडकरी,विठ्ठल माळी,वाणी काका,अमोल कासार,शहाजी ढोबळे,रेवण धायगुडे, गणपती धायगुडे,भाऊसाहेब हुबाले,श्रीमती शैलजा काळे,श्रीमती जयश्री उमाटे,भरत (दाजी) गुंड,सहदेव ढाकरे,गणेश गुंड,नृसिंह पवार,बालाजी गुंड, भाऊसाहेब चव्हाण,गजेंद्र चव्हाण,मुख्याध्यापक सुरवसे सर,रुपामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक मनसुळे सर,आंबेडकर विद्यालय व रुपामाता विद्यालयाचे सर्व शिक्षक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post