इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी सांघिक खेळातील विजया बरोबर मैदानी स्पर्धेत स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम ठेवली.उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानीस्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाचा विदयार्थी प्रदीप शिवाजी जाधव याने गोळाफेक व लांब उडी मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला.दि.3 आक्टोंबर रोजी नांदेड येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.तसेच ऋषिकेश आदटराव या खेळाडूची विभागीय क्रिकेट चाचणी साठी निवड झाली आहे.खेळाडूंच्या अप्रतिम यशाबद्दल कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी कौतुक व अभिनंदन करून सत्कार केला.तसेच प्राचार्या श्रीमती पाटील मॅडम यांनी खेळाडूंना राज्य स्तरावर निवड होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.या खेळाडूंना क्रीडाविभाग प्रमुख प्रा.प्रशांत काळे व नागनाथ पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी प्रा. विठ्ठल कुन्हाळे,प्रा.विद्यासागर गिरी,अंकुश शिंदे, काकासाहेब अनंदगावकर,प्रा.सुनिल बहिरे,प्रा.गणेश कांबळे,प्रा.उद्धव सोमवंशी,प्रा.वमुकुंद रसाळ,प्रा. राजेशा आष्टेकर,प्रा.सचिन शिंदे,प्रा.विष्णुदास कलमे,प्रा.ज्ञानदेव शिंदे,प्रा.विजय उंबरे,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
