इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळ मुक्तीसाठी राबवण्यात येणाऱ्या सुजलाम सुफलाम या अभियानाचा प्रारंभ लोहारा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दि.4 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले व बी.जे.एस. च्या जिल्हा समन्वयक सौ.कांचनमाला सांगवे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,नायब तहसीलदार रणजीत शिराळकर,नायब
तहसीलदार पंकज मंदाडे,तालुका कृषी अधिकारी मिलींद बिडबाग,लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता इ.टी.सुर्यवंशी,पं.स.सभापती ज्योतीताई पत्रिके,जि.प.सदस्या शोभाताई शामसुंदर तोरकडे,मंडळ अधिकारी आण्णासाहेब यादव,तलाठी जगदिश लांडगे,कृषी सहाय्यक ओ.एच.पाटील,ग्रामसेवक डी.पी.पवार,ग्रा.पं.सदस्य नितीन जाधव (मोघा बु),प्रकाश येणेगुरे,अरुण सारंग,अदि उपस्थित होते.
सदर योजने अंतर्गत उस्मानाबाद व लातुर या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.त्या अनुशंगाने लोहारा तहसील कार्याालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी व मान्यनरांच्या हस्ते जे.सी.बी.मशीनचे पुजन करुन करण्यात आला.या योजने अंतर्गत तालुक्यातील नाला सरळीकरण,विविध तलावातील गाळ काढुन तो शेतामध्ये टाकण्यात येणार आहे.
यामुळे गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार हि योजना यशसवी होवुन शेतकऱ्यांना याचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे.
