लोहारा तालुक्यातील 36 गावांची पिकांची आणेवारी 50 टक्क्यावुन जास्त दाखवली आहे.हि आणेवारी सुधारीत करावी,अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसने उपविभागीय अधिकारी उमरगा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- खरीप हंगाम 2018 मध्ये पावसाचा सलग 85 दिवसाचा खंड पडल्याने पिकांची परिस्थिती नाजुक झाली आहे.तरी लोहारा तालुक्यातील 36 गावांची पिकांची आणेवारी महसुल विभागानी 50 टक्के पेक्षा अधिक दाखवली आहे.तरी सुधारीत आणेवारी घोषित करुन चुकीची आणेवारी दाखवल्याबध्दल दोषींवर कार्यवाही करावी,

अशा मागणीचे निवेदन लाेहारा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उमदले(उमरगा)यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांना जेंव्हा पाण्याची गरज होती.तेंव्हा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील विविध गावांची परिस्थिती मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत वाईट आहे.

या हंगामात सर्वच खरीप पिकांचा उतारा 20 टक्के ही येणार नाही ही वस्तुस्तिथी असताना महसुल विभागाने जावाई शोध लावत 36 गावातील आणेवारी 50 पैशापेक्षा अधिक दाखविली आहे.सदरील अहवाल चुकीचा असुन तो वस्तुनिष्ठ नाही.प्रशासनाकडुन वारंवार या चुका घडत असल्याने शासनाच्या मदतीपासुन शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप शेतकरी वर्गातुन होत आहे.

 गेल्यावर्षी नुकसान झाल्याने या हंगामात हातचे पिक वाया गेले तर कांही तरी हातभार लागावा याकरीता यंदाही तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे.पिकविम्याच्या दाव्यासाठी ही आणेवारी उपयुक्त ठरते.परंतु गेल्यावर्षी प्रशासनाने चुकीची आणेवारी दाखविल्याने प्रचंड नुकसान झालेले असताना देखील उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील 75 हजार शेतकऱ्यांना पिकविम्यापासुन वंचित रहावे लागले.

  गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रशासनाने चुकीच्या पध्दतीचा अवलंब करीत 50 टक्केहुन अधिक आणेवारी दाखवली आहे.कांही गावामध्ये आतापासुनच टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामानंतर आता रब्बीच्या आशा बेभरवशावर पावसावर अवलंबुन असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

हि चुकीची लावलेली आणेवारी दुरुस्त करुन सुधारीत आणेवारी घोषीत करावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,उमरगा,लोहारा विधान सभा अध्यक्ष राहुल पाटिल,लोहारा तालुका अध्यक्ष किशोर साठे, लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख,जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवड़ी,बाजार समिती माजी सभापती दयानद गिरी,अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष मुख्तार चाऊस, नगरसेवक तथा गटनेता गगन माळवदकर,नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे,वडगाव सरपंच बबन फुलसुंदर, विजय लोमटे,युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर,नरदेव
कदम,उमेश देवकर,कमलाकर शिरसाठ,विधान सभा अल्पसंख्यक अध्यक्ष अमिन सुबेकर,संजय सूर्यवंशी, भास्कर माने,ताहेर पठान,अशपाक शेख,मलीनाथ जट्टे,अदिच्या सह्या आहेत.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post