पुरुषप्रधान व्यवस्थेने स्त्रियाना अंधश्रद्धांचे वाहक बनविले — राज्य सरचिटणीस प्रा.किरण सगर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- समाजात दिवसेंदिवस अनिष्ठ प्रथा-परंपरा वाढत असून त्याचे समुळ उच्चाटन होण्याच्या दृष्टीने स्त्री-पुरुषांनी जातीभेद बाजूला सारुन स्त्रीयांना सक्षम बनविणे गरजेचे असून पुरुषप्रधान व्यवस्थेने स्त्रियाना अंधश्रद्धांचे वाहक बनविले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रा.किरण सगर यांनी केले.

 जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,उस्मानाबाद आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा शहरातील भानुदास चव्हाण महाविघालयाच्या सभागृहात दि.3 ऑक्टोंबर रोजी माध्यमिक शिक्षकांकरिता 'वैज्ञानिक जाणिवा शिबीरात' प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी भानुदास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बिराजदार होते.या वेळी प्रमुख म्हणुन जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे,प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर,अॅड.अजय वाघाळे,केंद्र प्रमुख मनोहर वाघमोडे,प्रा.विपुल गायकवाड,दिलीप चौगुले,डॉ.श्रीकांत गायकवाड,सुधीर कांबळे,प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर,अदि उपस्थित होते.


या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे यानी मनोगतातून शिबीर घेण्यामागील भूमिका आणि शिक्षकांची जबाबदारी' स्पष्ट केली.डॉ.श्रीकांत गायकवाड यानी 'संत सुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन' या विषयावर मार्गदर्शन केले.सुधीर कांबळे यांनी 'वैज्ञानिक दृष्टीकोन'यावर मार्गदर्शन तर प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर यानी 'चमत्कार सादरीकरणसह बुवाबाजी आणि अंधश्रद्धा 'या विषयावर सविस्तर मांडणी केली.अँड.अजय वाघाळे यानी 'जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा'समजावून सांगीतला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.व्ही.पाटील व
सूत्रसंचालन अॅड.अजय वाघाळे यांनी केले तर आभार सुभाष कांबळे यांनी मानले.या वेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी झालेल्या शिबीरार्थीना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.वैज्ञानिक जाणीवा शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी शिक्षकांचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उत्तम प्रतिसाद मिळाला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post