जेवळी आरोग्य केंद्र व्हेंटिलेटरवर ; रुग्णांची हेळसांड ! दोन्हीही वैद्यकिय अधिकाऱ्यांची पदे रिक्त जेवळी परिसरात साथरोगाचा फैलाव


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील जेवळी परिसरात साथ रोगाचा फैलाव झाला असु एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.तरीही जेवळी ( उत्तर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 आरोग्य सेविका,2 वैदयकिय अधिकाऱ्यासह 3 पदे रिक्त आहेत.कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात  हेळसांड होत आहे.यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.हे आरोग्य केंद्रच व्हेंटीलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.   

                                                         लोहारातालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जेवळी (उत्तर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत जेवळी (उ),जेवळी (द), वडगाव (गांजा), माळेगाव, फणेपूर, पुर्व तांडा, पाश्चिम तांडा, पांढरी (वि), रुद्रवाडी,वाडी वडगाव,हिप्परगा (सय्यद) या गावाचा समावेश आहे.या केंद्रातर्गत 16065 नागरिकांवरती उपचाराची जबाबदारी आहे.या केंद्रात वैदयकिय अधिकारी 2, आरोग्य सेविका 4, आरोग्य सेवक 2, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 हवालदार 1,लिपीक 1, सेवक 4 अशा एकूण 15 जागा मंजुर आहेत.

परंतु यातील 2 वैद्यकिय अधिकारी,1 आरोग्य सेविका अशी एकूण महत्वाच्या 4 जागा रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवरती उपचार मिळत नाही.वैद्यकिय अधिकाऱ्यांची दोन्ही ही पदे रिक्त असल्याने आष्टाकासार येथील वैद्यकिय अधिकारी यांना 10 दिवसासाठी नियुक्त करण्यात आले आहे.जेवळी सह परिसरात साथ रोगाचा फैलाव होत आहे

व ताप,सर्दी,जुलाब,खोकला,आदी आजाराने रुग्ण हैराण झाले आहेत.तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या वैद्यकिय अधिकारी दुपारनंतर गायब असतात.यामुळे रुग्णांना  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे.यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.या आरोग्य केंद्रात रिक्त पदे आहेत.या आरोग्य केंद्रात कांही  अधिकारी व काही कर्मचारी वेळेवर येत नाहीत.अशा अनेक तक्रारी आहेत.याची कोणी ही दखल घेत नसल्याने रुग्णाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post