- डासांच्या उत्पत्तीत वाढ.
- नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
कुरूम :- स्थानिक बस स्थानका नजीक पुलासाठी खोदुन ठेवलेल्या खड्डयात दूषित पाणी साचल्याने त्या पाण्याची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांसह नागरिक त्रस्त झाले असून डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संबंधित विभाग याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
दूषित व दुर्गंधीयुक्त हिरव्या पाण्यात धामण जातीचे साप, विविध प्रकारचे जलकिडे, वनस्पती,डासाची उत्पत्ती झाली आहे तर पंन्या,केरकचरा मोठया प्रमाणात जमा झाला असून खड्डयाच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले आहे.या दूषित पाण्याच्या खड्डयानजीक हातपंप असून त्या हातपंपाचे पाणी पिण्यासाठी आरोग्यास हानिकारक असून होणारे आजार हे दूषित पाणी,डास यापासून मोठया प्रमाणात उद्भवतात.
सद्या अकोला जिल्हा विविध प्रकारच्या आजाराने ग्रासला असून डेंगू,मलेरिया,स्क्रब टायफस,डायरीया,कावीळ, जंतुसंसर्ग आजार मोठया प्रमाणात फोफावले आहे.
सबंधित प्रशासनाने याबाबीची दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी जन माणसात होत आहे.
