1098 या टोल फ्री नंबरच्या माध्यमातून, असहाय्य व मदतीची गरज असणाऱ्या लहान मुलांसाठी,सह्याद्री फाऊंडेशन्सव चाईल्ड-लाईन 24 तास मदतीला — डॉ.दापके-देशमुख दिग्गज


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- 1098 या टोल फ्री नंबरच्या माध्यमातून,असहाय्य व मदतीची गरज असणाऱ्या लहान मुलांसाठी,सह्याद्री फाऊंडेशन्सव चाईल्ड-लाईन 24 तास मदतीला तयार आहे,तरि लहान मुलांवर अन्याय,अत्याचार होत असल्यास *1098* या नंबरवर फोन करावे असे आवाहन सह्याद्रि फाउंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज यांनी केले.
तळजापुर तालुक्यातील जळकोट येथील जि.प.प्रा.
 शाळा,जि.प.कन्या शाळा व जि,प.मुलांची शाळा एकत्र करुन सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद चाईल्ड-लाईन या संस्थेच्या 1098 टोल फ्री नंबरची जनजागृती व शाळेतील शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र वितरण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी डॉ.दापके देशमुख दिग्गज बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रुषि ऊत्पन्न बाजार समिती उपसभापती सत्यवान सुरवसे (तुळजापुर) होते.यावेळी प्रमुख म्हणुन सह्याद्रि फाउंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके-देशमुख दिग्गज,माजी
 जि.प.सदस्य गणेश सोनटक्के,बाल कल्याण समिती
 समिती जिल्हा अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम,सरपंच सौ. अलकाताई हिंदोळे,उपसरपंच अर्जुन कदम,पत्रकार सतिश पिसे,सोमनाथ बनसोडे,दादा कोरके,
मुख्याध्यापक कांबळे सर,बाल कल्याण समितीच्या सदस्या सौ.कस्तुरताई कारभारी,गजानन पाटील,
सय्यद सर,श्रीमती टोणपे मँडम,अदि उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात  करण्यात आली.यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम यांनी बालरक्षा या विषयी सविस्तर माहिती सांगितली.व तसेच सत्यवान सुरवसे व गणेश सोनटक्के,अदिंनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री चे गजानन  पाटील यांनी केले.तर आभार बाल कल्याण समितीच्या सौ.कस्तुरताई कारभारी यांनी मानले.या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी,नागरिक,शिक्षक,
महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post