दुष्काळ परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेवुन अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई व चारा,अशा विविध कामाचे तात्काळ नियोजन करावे,खा.प्रा.रविंद्र गायकवाड


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सध्या लोहारा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असुन टंचाईबाबत ऑक्टोंबर महिन्यातच बैठका घ्याव्या लागत आहेत.इतकी गंभीर परिस्थिती यापुर्वी नव्हती,तरी अधिकारी व लोकप्रतिनिधीनी मिळुन या दुष्काळाच्या संकटातुन पुढे जाण्यासाठी मनापासुन प्रयत्न केले तरच आपण सर्व सामान्य मानसाला कांहीतरी न्याय देवु शकतो,तरी अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ उपाय योजना करावे,असे खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांनी सांगीतले.
लोहारा तहसील कार्यालयात दि.30 ऑक्टोंबर रोजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई व चारा टंचाई आढावा बैठक घेण्यात आली.या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आ.ज्ञानराज चौगुले,
तहसीलदार राहुल पाटील,नायब तहसीलदार पकंज मंदाड,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,जितेंद्र शिंदे,
शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरेतालुका कृषी अधिकीरी मिंलीद बिडबाग,ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता पी.व्ही.पाटील,लघु पाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी ई.टी,सुर्यवंशी,
जि.प.सदस्य,पं.स.सदस्य,सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा.प्रा.रविंद्र गायकवाड म्हणाले कि,लोहारा तालुक्यात सध्या खरीप हंगामातुन उपलब्ध होणारा चारा डिसेंबर अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे,यानंतर चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण होणार असुन,तरी आतापासुनच याचे नियोजन पशुधन अधिकारी व कृषी अधिकारी यांनी करावे.एखाद्या गावात विंधन विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आल्यास तो तात्काळ 3 दिवसाच्या आत मंजुर करुन पाणी टंचाईवर मात करावी.रोजगार हमी अंतर्गत जे जुने रस्त्याचे मातीकाम झाले असतील,अशांना खडीकरण करावे
व नविन शेतरस्ते,पाणंद रस्ते अशी कामे सुरु करुन मजुरांना काम उपलब्ध करुन द्यावे.भुकंपग्रस्त भागातील गावात अद्यापपर्यंत अंतर्गत रस्ते नाहीत तरी अशा रस्त्यांचे रोजगार हमी योजनेतुन मंजुरीसाठी वेगळे प्रस्ताव करावेत.महावितरण कंपनी कडुन वांरवांर विज पुरवठा खंडीत होतो.सतत डी.पी.
जळतात त्या लवकर दुरुस्त केल्या जात नाही,अशा तक्रारी आहेत.तरी याबाबत तात्काळ उपाय योजना करण्यात यावी,तरी या टंचाई काळात अधिकाऱ्यांनी
विलंब न करता नागरीकांच्या विविघ तक्रारीचा निपटारा करण्यात यावा,अशा सुचना खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांनी दिल्या.या बैठकील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post