सोनवणे यांना पत्रकारीता राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्यावतीने 2016 — 17 यावर्षीचे पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, यामध्ये उस्मानाबाद येथील दै.यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन दशरथ सोनवणे यांना राज्यस्तरीय स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

यापूर्वी सोनवणे यांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव पत्रकारिता पुरस्कार,समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार,कै.अनंत भालेराव स्मृती विशेष वार्ता पुरस्कार,कृषीरत्न डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती राष्ट्रीय कृषी वार्ता पुरस्कार,महात्मा गांधी तंटामुक्त गाव पत्रकारिता पुरस्कार,राजमाता जिजाऊ स्वालंबन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार,

महात्मा गांधी तंटामुक्त गाव पत्रकारिता,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार,आदी पुरस्कार मिळालेले आहेत. यावर्षी जाहीर झालेल्या स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्काराचे स्वरूप रोख 51 हजार रूपये,प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणिस यांच्या हस्ते सदरील पुरस्काराचे वितरण मुंबई येथे होणार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post