राष्ट्रीय समाज पार्टी पक्षाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी रघुविर घोडके तर शहराध्यक्षपदी संभाजी विरुध्दे


इकबाल मुल्ला
लोहारा :- राष्ट्रीय समाज पार्टी पक्षाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी रघुविर घोडके तर शहराध्यक्शपदी संभाजी विरुध्दे यांची निवड करण्यात आली आहे.उस्मानाबाद शासकीय विश्रामगृहात या निवडीचे नियुक्ती पत्र रा.स.प.पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर व उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले.या निवडीबध्दल लोहारा शहरात यांचा धनगर समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव अध्यक्ष दगडु तिगाडे,माजी पं.स.सदस्य सुधीर घोडके,प्रशांत लांडगे,सुर्यकांत पांढरे,महेश वाघे,काका घोडके,
विकास घोडके,नितीन वाघ,विजय महानुर,विक्रांत संगशेट्टी,बलभिम विरुध्दे,माजी सरपंच नवाज सय्यद,
यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post