इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील विलासपूर पांढरी येथे भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विदयमाने सुरु करण्यात आलेल्या नाला सरळीकरण खोलीकरण कामाचा शुभारंभ उस्मानाबाद जि.प.चे विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग,पंचायत समिती सभापती सौ.ज्योती ताई पञिके,सरपंच सौ.विदया ताई भुजबळ,शामसुंदर तोडकडे,अॅड.विश्वनाथ पञिके,काशीनाथ भुजबळ,कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील,नगरसेवक महेश माशाळकर,गौस शेख,पोलीस पाटील सुर्यकांत पाटील,पंडित कार्ले,योगेश जांभळे,डिगंबर मुळे,वसंत मुळे महादेव जायफळे,किसन खोत, यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

