इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- जमीयत उलमा - ए - हिंद शाखा उमरगा व तहसिल कार्यालय कार्यालय उमरगा यांच्यावतीने शहरातील आझाद चाैक येथे येथे मतदान जनजागृती अभियान
कार्यक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,तहसिलदार संजय पवार यांनी या मतदार जनजागृती अभियानाची सुरुवात केली.
या वेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले म्हणाले कि,देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी युुवकांनी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून घ्यावी.नाव नसेल तर नवीन मतदार नोंदणी करुन घ्यावी,असे सांगीतले.
यावेळी तहसीलदार संजय पवार यांनी मतदार नोंदणीचे महत्व सांगितले.या कार्यक्रमास मौलाना गुलामनबी मलंगसाब बलसूरी,फेरोज अ.रज्जाक शेख,हाफिज युसुफ मोहियोद्दीन शेख,हाजी नवाबसाब,साजीद लदाफ,अल्लाऊद्दीन शेख,वजीर शेख,निजाम जमादार,नसीम मळगे,मोहसिन शेख,
यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
