गणेश उत्सवानिमित्त ह.टिपु सुलतान ग्रुप यांच्यावतीने स्पर्धा परिक्षा घेण्यात आली — या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- गणेश उत्सवानिमित्त लोहारा शहरातील ह.टिपु सुलतान ग्रुप यांच्यावतीने विध्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती.या स्पर्धेतील यशस्वी विध्यार्थ्यांना शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणून विकास समिती अध्यक्ष जालिंदर भाऊ कोकणे,नगरसेवक आतिक पठाण, विजयकुमार ढगे,नगरसेविका श्रीमती जयश्री कांबळे,
प्राचार्या यु.व्ही.पाटील,जुनेद खाणापुरे,ह.टिपु सुलतान ग्रुप चे अध्यक्ष ईम्रान शेख,अक्सा ग्रुप अध्यक्ष राज भाई चाऊस,अल्ताफ शेख,सलामन शेख,शोयब  मनियार,दस्तगीर शेख,अमजद जेवळे,आकबर  इनामदार, अक्षय माटे,अदि उपस्थित होते.या स्पर्धेतील मोठा गटातुन प्रथम पारितोषक
नगरसेवक अातिक पठाण 2100 रुपये,द्वितीय पारितोषक अमिन सुंबेकर 1500 रुपये तर तृतीय पारितोषक नगरसेवक श्रीमती जयश्री कांबळे 1000 रुपये यांच्याकडुन देण्यात आले आहे.तर लहान गटातुन प्रथम पारितोषक नगरसेविका साै.सुनिता विजयकुमार ढगे 1500 रु व द्वितीय पारितोषक मुन्ना खानापुरे मित्रमंडळ 1000 रु तर तृतीय पारितोषक अक्सा ग्रुप अध्यक्ष राज भाई चाऊस 751 रु पारितोषक यांच्यावतीने देण्यात आले.
या स्पर्धेत मोठा गटातुन प्रथम क्रंमाक आईशा मनियार व द्वितीय क्रंमाक संजोत सुर्यवंशी तर तृतीय क्रंमाक हिंदवी लांडगे यांनी मिळविला.तर लहान गटातुन प्रथम क्रंमाक सम्रुध्दी कदम व द्वितीय क्रंमाक प्रतिक माळवदकर तर तृतीय क्रंमाक प्रज्योत माळवदकर याने मिळविला.या कार्यक्रमास शिक्षक,
विद्यार्थी,ग्रुपचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post