इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सिंहगड महाविद्यालय येथे नुकताच पार पडलेल्या सोलापुर विद्यापीठाच्या पंधराव्या 'उन्मेष सृजनरंगाचा' या युवा महोस्तवात अक्कलकोट मधील मयूर स्वामी याने डी.ए.व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाच प्रतिनिधित्व करत सलग चौथ्यावर्षी शास्त्रीय सुरवाद्य या कलाप्रकारात प्रथम क्रमांक पटकविला आहे.यांना सोलापुर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले,आमदार प्रणीती शिंदे, संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले,डॉ.व्ही.बी.
पाटील,विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.सूर्यकांत शिंदे,आदि उपस्थित होते. या महोस्तवात मल्लिकार्जुन कुंभार यांनी तबला साथ दिली.मयूर स्वामी गेली आठ वर्षे संगीतालंकार एस.एस.कलबुर्गी यांच्या कढे संगीत शिक्षण घेत आहेत.या यशाबद्दल डी.ए.व्ही.वेलणकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. कीर्ति पांडे,संगीतालंकार एस.एस.कलबुर्गी, प्रा.डॉ.सुनील पाटील,प्रा.सुमित गाडेकर,प्रा.प्रीति कोठारी,ओंकार पाठक,प्रा.किशोर थोरे,प्रा.शिवाजी राजगुरु,आदित्य जोशी,अक्षय सरदेशमुख,आकाश चव्हाण,इरेश फताटे,महेश स्वामी,आदीनी अभिनंदन केले.
