माहीलांनी राजमाता विजयाराजे शिंदेंचा आदर्श समोर ठेवावा — महिला प्रदेशाध्यक्षा अॅड.माधवी नाईक


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या महिला लोकप्रतिनिधी व महिला पदाधिकारी राजमाता विजयाराजे शिंदेचा आदर्श समोर ठेवून संसारा सोबत समाजकारण आणि राजकारणासाठी वेळेचं नियोजन करुन अभ्यास करुन मिळालेल्या संधीचे सोने करावे,असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष अॅड.विकेट माधवी नाईक यांनी केले.
 उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले  हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित जागर आदिशक्तीचा सन्मान लोकप्रतिनिधीचा या कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर होते तर प्रमुख म्हणुन महिला मोर्चाच्या प्रदेश भाजप प्रभारी उमा खापरे,महिला जिल्हाध्यक्ष क्रांती थिटे,महिला प्रदेश भाजप महिला आघाडीच्या कार्यकारीणी सदस्या मंजुषा कोकीळ, जिल्हा चिटणीस सौ.वैशाली वरुणकर,मिनाताई सोमाजी, पुजा देडे,प्रमिला शेळके,पद्मिनी घोडके, भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना अॅड.नाईक पुढे म्हणाल्या की, नवरात्री उत्सवाचा सामाजिक आशय समाजासमोर ठेवण्याचा ठेवण्याच्या उद्देशाने नवरात्र काळात देवी देवीच्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठां व्यतिरिक्त राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले संत जनाबाई यांच्या जन्मस्थळी जाऊन त्या ठिकाणच्या कर्तृत्वान महिलांचा सन्मान आणि त्यांच्याशी संवाद आम्ही साधत आहोत.याचा एक भाग म्हणून उस्मानाबाद येथे शक्तीपीठ श्री तुळजाभवानीच्या परिसरातील लोकप्रतिनिधी महिलांचा सन्मान करत आहेत. महिलांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी पुढे यावे कारण भाजपा महिलांना न्याय देऊ शकतो. सुषमा स्वराज,निर्मला सीतारामन,पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून महिला देश राज्य चालवत आहेत.जनसेवा करत आहेत.ग्रामीण भागातल्या महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना आणून महिलांना त्रासातून मुक्त केले आहे.घरोघरी स्वच्छतागृहे उभारून महिलांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवला माझी कन्या भाग्यश्री मुळे महिलांचा सन्मान केला.या योजनांच्या माध्यमातून महिलांसाठी  न्याय देणारा एकमेव पक्ष  असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा महिला मोर्चा प्रभारी उमाताई खापरे यांनी राजमाता जिजाऊंच्या सिंदखेड राजाला एक माळ मातृत्वाची कोल्हापूरला एकमाळ शौर्याची सावित्रीबाईंच्या नायगावला एक माळ कर्तृत्वाची सामाजिक संदेश देत महाराष्ट्रातील आदिशक्तीचा जागर सामाजिक संदेश देत महाराष्ट्रातील आदिशक्तीचा जागर भाजपा महिला मोर्चा करत आहे. कुणी भाजपात महिलांना ते तीस टक्के आरक्षण असून महिलांचा योग्य सन्मान भाजपच करू शकते त्यामुळे भाजपा महिलांना ते तीस टक्के आरक्षण असून महिलांचा योग्य सन्मान भाजपाच करू शकतो त्यामुळे गावागावात निवडून आलेल्या सरपंच नगरसेविका ग्रामपंचायत सदस्य महिला लोकप्रतिनिधींनी पक्षाचे काम निष्ठेने व अभ्यासपूर्वक करून जनतेला विश्वास द्यावा या यावेळी सुनंदाताई काळे संयोगिता गाढवे सुनंदा नरोटे मीरा सचिन घोडके मंदाकिनी ढगे आदी लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य  नितीन काळे,अॅड.अनिल काळे,सुधीर पाटील,अॅड. नितीन भोसले,नागेश नाईक,भाजप मिडिया विभाग जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे,नगरसेवक बालाजी कोरे,बालाजी कोरे,प्रेमाताई पाटील,उपनगराध्यक्षा संयोगीता गाढवे,नगराध्यक्षा सुप्रिया वारे,नगरसेविका ज्योती साळुंके,प्रिया ओव्हाळ,राणीताई पवार,सुनंदा काकडे,अंजना पवार,श्रीमती प्रितीताई मंजुळे,अपर्णा नाईक, कल्पना केळे,उमा क्षिरसागर,शिल्पा शिंदे, सुनंदाताई वरवटे,राजेश्वरी स्वामी,अनुसया नागदे, समीनाबी लुकडे,ऊर्मिला मदने, निशाताई कळंबकर, संगीता कोकीळ,चंद्रकला घोडके,महानंदा पैलवान, मुंबरे ताई,पडवळ ताई,संगीता कदम,सगुणा आचार्य, प्रिती गाढवे,प्रभावती मार्डीकर,यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post