पालकमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी लोहारा तालुक्यातील दुष्काळ भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधुन समाधान केले


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त जिल्ह्याचे पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालक मंत्र्याना दिले होते.त्या अनुषंगाने दि.15 ऑक्टोंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री अर्जुन खोतकर यांनी लोहारा तालुक्यातील दुष्काळ भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधुन समाधान केले.
 लोहारा तालुक्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला आहे.त्यामुळे हंगामी पिकावर याचा परिणाम झाला आहे.मुग सोयाबीन उडीद हे पिके पाण्या वाचुन करपुन गेली आहेत.त्यातच सोयाबीनला उतार कमी पडत असल्यामुळे शेतकरी हवाल दिल झाला आहे.
लोहारा तालुक्यात पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.  माकणी निम्न तेरणा प्रकल्प धरणातील पाणी पातळी कमी होत चालली आहे.जमिनीत ओल नसल्याने रब्बीची पेरणीची शक्यता कमी आहे.
लोहारा तालुक्यातील मार्डी येथील शेतकरी भारत नागनाथ मस्के व पंडीत मस्के यांच्या तुर पिकाची पालकमंत्री ना.अर्जुनराव खोतकर यांनी पाहणी केली.
व लोहारा खु,समुद्राळ,माकणी,अदि ठीकाणी भेटी देवुन शेतकऱ्यांशी व नागरीकांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी भयाण दुष्काळी परिस्थीतीमुळे खरीप हंगामाचे पिक वाया गेले असून गतवर्षीचा सोयाबीन पिक विम्यासाठी उस्मानाबाद व लोहारा तालुक्याला वगळून विमा कंपन्यांनी व शासनाने अन्याय केला असून याबाबत आपण सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी असे सांगीतले.व विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्याला दिले.राज्य शासन शेतकऱ्यांसाठी योग्य ती मदत करण्यास कटिबद्ध आहे,असे पालकमंत्री खोतकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना संवाद साधताना सांगीतले.
 यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,खा.प्रा.रवींद्र गायकवाड,आ.ज्ञानराज चौगुले,उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप,तहसीलदार राहुल पाटील,नायब तहसीलदार रणजित शिराळकर,सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख,ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता पी.व्ही.पाटील,लघु पाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी ई.टी.सुर्यवंशी, प्रभारी सरपंच दत्ता पाटील,गटनेता तथा नगरसेवक अभिमान खराडे,युवा सेना तालुकाप्रमुख दिपक मुळे, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख,योगेश देवकर,
नगरसेवक शाम नारायणकर,अमोल ओवांडकर,
किशोर भालेराव,उत्तम कदम,शाहुराज बिराजदार, दत्तात्रय देवकर,ज्ञानेश्वर सुर्यवंशी,यांच्यासह शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post