इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील सास्तूर चौरस्ता येथे भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना दि.30 सप्टेंबर रोजी सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.यावेळी खासदार
प्रा.रविंद्र गायकवाड,विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांच्या हस्ते विद्यार्थांना शालेय साहित्य व महिलांना साड्या वाटप करण्यात आले.
दि.30 सप्टेंबर 1993 साली लोहारा,उमरगा व औसा या तीन तालुक्यात झालेल्या प्रलंकारी भूकंपात हजारो जण मृत्युमुखी पडले होते.भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना दर वर्षी सास्तूर चौरस्ता येथे ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात येते.भूकंपाच्या घटनेला दि.30 सप्टेंबर रोजी 25 वर्षपूर्ण झाले. त्यानिमित्त रविवारी सास्तूर चौरस्ता येथे असलेल्या समृतीस्तंभास पुष्पाहार अर्पण करून भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना सामूहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी प्रमुख म्हणुन खासदार प्रा.रविंद्र गायकवाड,विभागिय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ.राधाकृष्ण गमे,अप्पर जिल्हाधिकारी सोनम पराग,जिल्हा पूनर्वसन अधिकारी डॉ.निलेश श्रींगी,उपविभागिय अधिकारी विठ्ठल उमदले,तहसीलदार राहुल पाटील,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे,संयोजक महमद बागवान, लायकसाब कादरी,सरपंच यशवंत कासार,पंडीत ढोणे,रब्बानी नळेगावकर,असिफ मुल्ला,मन्सूर बागवान,रावसाहेब सरवदे,बालाजी नादरगे,विष्णू वाघमारे,फजल कादरी,सालार सवार,दिलीप बेडगे, श्रीधर बेडगे,अदि उपस्थिती होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व गरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.यावेळी सास्तुर परिसरातील नागरीक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
