उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा,यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा,अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयावर दि.9 ऑक्टोंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष सौदागर केदार यांनी भव्य बैलगाडी मोर्चा काढला.
  यावर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही.त्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे.शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही.जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परस्थिती असताना महसूल प्रशासनाने मात्र 50 टक्के पेक्षा अधिक पैसेवारी जाहीर करून शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे.असा आरोप करीत भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.या बैलगाडी मोर्चास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी साडे अकरा वाजाजायच्या सुमारास सुरुवात करण्यात आली.हा बैलगाडी मोर्चा महात्मा फुले चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक मार्गे तहसील कार्यालयावर जावुन  धडकला.महसुल विभागाने जास्तीची व चुकीची जाहीर केलेली पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी करावी, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा,शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत जाहीर करण्यात यावी, जनावरांसाठी चारा छावण्या तत्वरीत सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे वीज देयक माफ करावीत आदी मागण्यांचे निवेदन पेशकार बालाजी चामे यांना देण्यात आले.यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सौदागर केदार,आदम शेख,अॅड.जयपाल पाटील,मनोज जाधव,जुबेर शेख,आदम शेख,अण्णासाहेब दराडे, मरअली शेख,प्रताप पवार,काशिनाथ शिंदे,चन्नाप्पा साखरे,महमद अत्तार,मनोज जाधव,हैदर शेख,सिद्राम राठोड,किसन कुलकर्णी,चन्नप्पा साखरे,यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते  व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

     
        तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती
           पक्षाचे पाऊणतास ठिय्या आंदोलन

   कार्यालयात तहसीलदार,नायब तहसीलदार कोणीच उपस्थित नव्हते,जोपर्यंत सक्षम अधिकारी येऊन निवेदन स्विकारीत नाही,तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार अशी भूमिका मोर्चे करऱ्यांनी घेऊन कार्यालयासमोर पाऊण तास ठिय्या आंदोलन केला.
तहसीलदार तुळजापुरला व नायब तहसीलदार जिल्ह्याला बैठकीला गेले होते.या मोर्चेकरांची पोसीस प्रशासनाने समजुत काढल्याने शेवटी या मागण्यांचे निवेदन पेशकार यांना देण्यात आले.या मागण्या सात दिवसात दिवसात मान्य कराव्यात,अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चुभाऊ कडु यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात येईल,असे जिल्हा अध्यक्ष सौदागर केदार यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.या मोर्चात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला,शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post