इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- शेतकऱ्यांना सबसिडीवर हरभऱ्याची बियाणे उपलब्ध करून ध्यावीत,अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विभागीय आयुक्त,जिल्हाधीकरी उस्मानाबाद व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदन पत्रात म्हटले आहे की,सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र रब्बी पेरणीसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे.परंतु कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सबसिडीवर दिले जाणारे महाबीज कंपनीचे बियाणे अद्याप ही उपलब्ध करून दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बाजार भावाप्रमाणे बियाणे खरेदी करावे लागत आहे.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानिस सामोरे जावे लागत असून मागच्या वर्षीच्या तूर,हरभऱ्याची देयके अद्यापपर्यंत न मिळणे, यंदाच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे पिकांचे उत्पन्न घटणे, व यंदा उत्पादन झालेल्या धान्याची विक्री न करू शकणे,कर्जमधून मुक्तता न होणे आदी बाबींमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे.
यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 दिवसांच्या आत महाबीजचे सबसिडीवरील बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आ.ज्ञ्नराज चौगुले यांनी केली आहे.
