उद्योग नगर लोहारा येथे प्रेमासाई महाराज यांच्या संकल्पनेतून गाव प्रकाशीकरण


यवतमाळ(प्रतिनिधी) :  यवतमाळ नजीक असलेल्या लोहारा परिसरातील उद्योग नगर येथे प्रेमासाई महाराज यांच्या संकल्पनेतून गाव प्रकाशिकरण योजनेचे काम पुर्ण झाले. प्रेमासाई महाराज यांच्या हस्ते या योजनेचा उद्‌घाटन सोहळा मंगळवारी सायंकाळी 7 वा.च्या सुमारास संपन्न झाला. गाव प्रकाशिकरण झाल्यामुळे परिसरातील गावकरी आनंदात आहे.
विशेष म्हणजे या परिसराची हद्दवाढ सन 2016 मध्ये झाली.

मात्र हा परिसर ना न.प.मध्ये, ना ग्राम पंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आला नाही. त्यामुळे येथील विकास पुर्णत: थांबला. या ठिकाणी चावडी वस्ती आहे. परिसरातील नागरीकांनी आपली हद्द कुठे आहे, शोधण्याचा प्रयत्न केला असता पोडावर देवी आहे, तेथून सुरुवात झाल्याचे समजले. 2016 मध्ये हद्दवाढ झाली आहे. मात्र काहीच सोयी सुविधा नाही.


लाईट नाही, रस्ते नाही, पाणी नाही या समस्या घेवून जिल्हाअधिकारी यांच्या कळे गेले पण जिल्हाधिकारी या विषयावर काही बोलायला तयार नाही. या ठिकाणी जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सीओ येवून गेले होते. त्यांचाही न.प.मध्ये या भागाचा समाविष्ट करण्यावर भर दिसला. या ठिकाणी कोलाम, आदिवासी बंधू राहतात. हातावर आणणे आणि पानावर खाणे, यामुळे शासन दरबारी चकरा मारुन येथील  नागरीक त्रस्त झाले आहे. उन्हाळामध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला.  येथील चौधरी नामक व्यक्तीने पाण्यासाठी मोटार दिली मात्र पाईप दिले नाही.

त्यामुळे या संपूर्ण समस्या घेवून येथील नागरीक संजय चव्हाण यांचे नेतृत्वात प्रेमासाई महाराज यांना भेटले. व प्रेमासाई महाराज यांनी तात्काळ दखल घेवून या ठिकाणी भेट दिली. व भेट देवून परिसरामध्ये लाईटची व्यवस्था करुन दिली.       त्यामुळे हा परिसर पुर्णत: उजळून निघाला. तसेच या परिसरामध्ये भरपूर प्रमाणात अस्वच्छता महाराजांना दिसली. अस्वच्छता दिसताच महाराज म्हणाले की, या ठिकाणी फॅागींग मशीनची व्यवस्था प्रेमासाई फाउंडशेनतर्फे करण्यात येईल. त्यामुळे डेंगु मलेरिया या परिसरात वाढणार नाही.


तसेच अजुन काही सहकार्य लागत असेल तर तसे नागरीकांनी कळवावे. प्रेमासाई फाउंडेशनतर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन प्रेमासाई महाराज यांनी नागरीकांना दिले. या वेळी परिसरातील  नागरीनीं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी नाईक यांनीही आपले विचार मांडले. संजय वाघमारे यांचा प्रेमासाई महाराज यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच प्रेमासाई माहराजांचा गावकरींतर्फे शाल व श्रीफळ देवून  सत्कार करण्यात आला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post