जिल्हा आप्पती व्यवस्थापक अभियाणतंर्गत लोहारा शहरातील शिवाजी चौकात जनजागृती व रंगीत तालीम घेण्यात आली.


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील शिवजी चौक येथे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या मार्गगदर्शनाखाली जिल्हा आप्पती व्यवस्थापक अभियाणतंर्गत जिल्हा आप्पती व्यवस्थापक अधिकारी वृषाली तेलारे यांनी दि.1 ऑक्टोंबर रोजी जनजागृती व रंगीत तालीम कार्यक्रम घेतला.
 लोहारा शहरातील शिवाजी चौक येथील जुनी पं.स.ची बिल्डिंग कोसळुन यामध्ये 4 ते 5 जण अडकले आहेत.अशी माकर्डील करुन हि माहीती आप्पती व्यवस्थापक यांच्याकडुन फोन द्वारे महसुल विभाग,पोलीस ठाणे,आरोग्य विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आली हाेती.अशी
माहीती मिळताच तात्काळ लाेहारा पोलीस ठाण्याचे पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह अवघ्या पाच मिनिटाच्या आत सर्व कामे सोडुन वाहन उपलब्ध नसताना खाजगी वाहन घेवुन घटनास्थळी दाखल झाले.व तसेच महावितरण कंपणीचे सहाययक अभियंता आर.डी.चिगुरे यांनी तात्काळ शहरातील विद्युत पुरवठा बंद करुन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.व महसुल विभागाचे नायब तहसीलदार रणजित शिराळकर,आप्पती व्यवस्थापनचे अव्वल कारकुन अशोक शिंदे,पेशकार ए.एस.रांजणकर,तलाठी बी.बी.कांबळे,पुरवठा विभागाचे कर्मचारी एम.एच.
क्षीरसागर,हे ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.व तसेच लोहारा नगरपंचायतचे नगरसेवक तथा शिवसनेचे गटने अभिमान खराडे,नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे गटनेते गगन माळवदकर,नगरसेवक आतिक पठाण,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी तात्काळ हजर झाले होते.यावेळी आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग घटनास्थळी हजर झाले नाहीत.यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलारे यांनी नैसर्गिक संकटाला न घाबरता त्याववर कसे मात करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन नागरीकांची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली. यावेळी शहरातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post