उमरगा :- पिंपळगाव (ब) श्री सेवा लॅबोरेटरी केंद्राच्या उदघाटनप्रसंगी बोलताना भास्कर बनकर. समवेत गणेश बनकर, सतीश मोरे, शिवाजी पवार, संदीप पवार, अनिल राठोड व मान्यवर.तालुक्यातील पिंपळगाव बसवंत निर्यातक्षम द्राक्ष व इतर उत्पादनासाठी माती, पाणी, पानदेठ परीक्षण अत्यंत महत्वाची बाब असून, शेतकऱ्यांची हि गरज ओळखून श्री सेवा लॅबोरेटरी अँड केमिकल्स या संस्थेने पिंपळगावसारख्या द्राक्षपंढरीत सेवा उपलब्ध करून दिली आहे.
आपण ज्या शेतीतून पिढ्यानपिढ्या उत्पादने घेतो आहे. त्या शेतीचे आरोग्य जपणं हेही आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे जर या काळ्या आईला दीर्घायुषी ठेवायचं असेल तर या अत्यंत महत्वाच्या अशा माती आणि पाणी परिक्षणाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही.
शेतीतुन ज्यादा उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र यामुळे शेतीच आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. शेतीच हे आरोग्य टीकवून ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आपल्या शेतीतल्या मातीच आणि पाण्याच परीक्षण करणं हिताच ठरत.
आजच्या यांत्रिक आणि तंत्रज्ञानाच्या युगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शेतकऱ्याना दर्जेदार आणि निर्यातक्षम कृषी उत्पादन घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच प्रारंभी विविध परीक्षण करणे महत्वाचे आहे. माती, पाणी यातील घटकांचा समतोल राखल्यास निश्चित निर्यातक्षम उत्पादन घेता येते म्हणूनच शेतकऱ्यांनी वरील परीक्षण करून सुधारित शेती करावी, असे आवाहन यावेळी शिवाजी पवार सांगत होते.
या वेळी श्री सेवा लॅबोरेटरी अँड केमिकल्स चे चेअरमन संदीप पवार यांनी बोलत होते.
रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रीय शेतीतुन घेण्यात येणाऱ्या उत्पन्नाबाबत व संपूर्ण पद्धतीची माहिती जाणून घेऊन जैविक व सेंद्रीय खताचा वापर करणे घरजेचे आहे व माती पाणी परीक्षण हि काळाची गरज आहे असे संबोधन करत सेंद्रीय शेतीचे महत्व शेतकऱ्याना पटवुन दिले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी सरपंच भास्कर( नाना ) बनकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर,सतीश मोरे, दिपक बनकर, केशव बनकर, शंकर पवार, श्री सेवा लॅबोरेटरी अँड केमिकल्स चे संस्थापक अनिल राठोड, शिवाजी पवार, संदीप पवार,सुधाकर पवार, तेजस पवार, सतीश पवार, सचिन पवार, मिथुन पवार आदी नि मान्यवरांचे स्वागत केले