इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- नेहरु युवा केंद्र भारत सरकार संलग्न ग्रामिण समाज सुधारक मंडळ माडज व जिल्हा माहिती कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा,लोहारा तालुक्यातील ग्रा.पं.सदस्य,सरपंच,जि.प.सदस्य,पं.स.
सदस्य,यांची शासकीय योजनांची कार्यशाळा व शासनाचे मुख्यपत्र लोकराज्य या मासिकाचे सामुहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उमरगा शहरातील पं.स.च्या सभागृहात दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता आ.ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व लोहारा पं.स.च्या सभागृहात दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता लोकमंगल म.को.ऑ.सो.चे रोहन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर मुरुम येथील आण्णाभाऊ साठे सभागृहात दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी तिन वाजता जि.प.चे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय योजनेची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत शासकीय योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे,तरी या कार्यक्रमास सरपंच,
ग्रा.पं.सदस्य,जि.प.सदस्य,पं.स.सदस्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे अवाहान जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व संस्थेचे संस्थापक सचिव तानाजी गायकवाड यांनी केले आहे.


