इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा विकास समितीच्या अध्यक्षपदी जालींदर कोकणे व उपाध्यक्षपदी शंकर जट्टे तर सचिवपदी कालीदास गोरे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरासह तालुक्यातील समस्या, विकासाचे धोरण,शेती,उद्योग,शिक्षण,आरोग्य अशा अनेक प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.यावेळी लोहारा विकास समितीची स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये समितीच्या सदस्यपदी म्हणुन नागाण्णा वकील,व्यंकट घोडके,बालाजी मक्तेदार,अँड. मल्लिनाथ वचने पाटील,शब्बीर गवंडी,मुरलीधर चव्हाण,विजयकुमार नारायणकर,बाळासाहेब कोरे, गोरख नारायणकर,शरण्णाप्पा कबाडे,बालाजी बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्वांचे शहरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
