केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटनेचा भारत बंद



  • अत्यावश्यक सेवेची गरज पडल्यास संपर्क करण्याचे आवाहन
  •  बंद दरम्यान दोन मिडीकल स्टोअर्स राहणार सुरू


      यवतमाळ, दि. 26 : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट संघटनेने ऑनलाईन फार्मसी विरोधात 28 सप्टेंबर 2018 रोजी भारतभर सर्व किरकोळ / घाऊक औषध विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंद 27 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजतापासून 28 सप्टेंबर रोजी रात्री 12 पर्यंत ठेवण्यात येईल. या कालावधीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील जीवनधारा मेडीकल आणि अमृत दिनदयाल फार्मसी ही दोन दुकाने औषधी विक्रीकरीता सुरू राहणार आहेत.

            तसेच बंदच्या काळात अत्यावश्यक सेवेची गरज पडल्यास जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष पंकज नानवाणी (मो. 7588220111), संघटनेचे सचिव संजय बुरले (मो. 9422165550) यांच्यासह तालुका प्रतिनिधी योग्य ते सहकार्य करतील, असे केमिस्ट संघटनेने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला कळविले आहे. याशिवाय औषध विक्रेत्यांच्या बंदच्या काळात ग्राहकांना अत्यावश्यक सेवेची गरज पडल्यास अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (औषधे) मिलिंद काळेश्वरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कार्यालयाने कळविले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post