मुर्तिजापुर :- मुर्तिजापुर येथील जुनी वस्ती परिसरातील न.प. च्या अधिनस्त असलेल्या शाळेची दयनीय अवस्था झालेली आहे. या आवारात इंदिरा गांधी मुलींची शाळा, सवित्रीबाई फुले प्राथ. शाळा, राजीव गांधी न.प. मुलांची शाळा व सय्यद सर अहमद खान ऊर्द प्राथ. शाळा अशा 4 शाळा आहेत. न.प. प्रशासनाने शहरामध्ये जिकडे – तिकडे दुकान कॉम्पलेक्स बांधले. परंतू सार्वजनिक मुत्रीघराचा प्रशासना तर्फे तिळमात्र सुध्दा विचार केला गेला नाही. त्यामुळेच शाळा आवारात सर्रास सामान्य नागरिक लघुशंके करिता येतात. शाळा सुरु असतांना परिस्थिती तशीच असते. लघुशंके बरोबरच शौचास सुध्दा व इतर घाण करतात. सर सययद अहमद खान ऊर्द शाळेच्या मागे बाजूला असलेल्या गटार साफ न केल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटून डासांचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुलांना खेळण्याकरिता मैदाना बरोबर नसल्यामुळे त्यांच्या खेळण्यावर एकप्रकारे बंधनच निर्माण केले आहे. शासना मार्फत राबविण्यात येणा-या वृक्ष लागवडीचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या 5 वर्षापासून नांवापुरते वृक्षरोपण करण्यात येते. मोकाट फिरणा-या जनावरांमुळे असलेल्या वृक्षांची सुध्दा विल्हेवाट लागत आहे. त्यामुळे मुलांना आवश्यक पोषक असे पर्यावरण वातावरण मिळत नाही आहे. अशा विविध समस्यां पासून मुलांना मिळणा-या असुविधां पासून मुक्त होण्याकरिता शाळा व्यवस्थापन व न.प. प्रशासनाने मुख्या प्रवेश व्दार 7 दिवस 24 तास बंद ठेवण्याचे निवेदन पब्लिक राईट ऑरगनाइजेशन, मुर्तिजापुर च्या वतीने वरील शाळा मुख्याध्यापकांना देवून त्याच्या प्रति मुख्याधिकारी न.प.मुर्तिजापुर, मा. नगराध्यक्षा, आरोग्य सभापती, शिक्षण सभापती यांना देण्यात आल्या आहेत.
न.प. शाळेतील मुलांच्या आरोग्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत करण्याची पब्लिक राईट ऑरगनाईजेशन ची मागणी