इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालय ओम शांती शाखा लोहारा यांच्यावतीने लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात,लोहारा पोलीस ठाण्यात,जेवळी येथील बसवेश्वर हायस्कुल, सास्तुर येथील स्पर्श ग्रामिण रुग्णालयात रक्षा बंधनाचा कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.यावेळी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विध्यालय शाखा सरिता बहनजी(लोहारा),बार्शी येथील अनिता बहनजी,अदि उपस्थित होत्या.
यावेळी सरिता बहनजी व अनिता बहनजी यांनी रक्षाबंधन म्हणजे काय,व आपण का साजरा करतो,दैनंदिन जिवनात तनावमुक्त जीवन कसे जगावे,नैतीक मुल्यांची जोपासना,
देशभक्ती,जिवनातील सहज राजयोगाचे महत्व,
विद्यार्थी जीवनातील मुलामुलींच्या समस्या व यावर उपाय,शिक्षक,पालक समाजाविषयी आदरभाव चिकाटी, मोठी स्वप्ने,अदि विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी जेवळी येथील बालब्रम्हचारी गंगाधर महाराज यांना राखी बांधुन प्रसाद घेण्यात आला.या कार्यक्रमास अध्यक्ष भुसणे पाटील,
यांच्यासह मुख्याध्यापक,शिक्षक,पोलीस अधिकारी,
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

