मोबाईल चोरट्याला केले गजाआड



यवतमाळ :- पुसद उपविभागाअंतर्गत येणाऱ्या हनुमंत खेडा याठिकाणी एक तरुण काही लोकांना नवीन महागडे अँड्रॉइड  मोबाइल स्वस्त किमतीत विक्री करत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके सहायक पोलिस उपनिरिक्षक साहेबराव राठोड पोलीस कर्मचारी गोपाल मास्टर मुन्ना आडे हरीश राऊत यांनी मोबाईल विक्री करणारा तरुण राजेश राम प्रसाद राठोड राहणार हनवतखेडा याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमधून विविध कंपनीची 24 महागडे अँड्रॉइड मोबाइल व 4 मोबाइल पावर बॅंक असा एकूण 3 लाख 75 हजार 919 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या तरुणाने हे मोबाईल कुठून आणले होतो कमी किमतीत का विक्री करता याचा तपास पोलीस पथक करीत आहे ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार  अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post