वाघग्रस्त भागातील नागरीकांना भेटून दिला धीर मी तुमच्या पाठीशी- खासदार भावनाताई गवळी

 पिंपळशेंडा गावात नागरीकांशी संवाद साधतांना खासदार भावनाताई गवळी सोबत वन अधिकारी

 यवतमाळ :- टिपेश्वर अभयारण्यातील वाघीन राळेगाव, कळंब भागातील नागरीकांच्या जीवावर उठली आहे. दरम्यान या संकटग्रस्त काळात खासदार भावनाताई गवळी यांनी कळंब, राळेगाव भागातील नागरीकांसोबत संवाद साधून त्यांना धीर दिला. मी तुमच्या पाठीशी आहे असे अभिवचन देत वन अधिका-यांना सुध्दा वाघाला तातडीने जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या.

राळेगाव, कळंब तालुका परीसरात दिड वर्षात वाघाच्या हल्यात 13 नागरीकांचा बळी गेला आहे. वन विभाग मात्र अजुनही थातुरमातुर कारवाई करीत आहे. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेनेच्या आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा खासदार भावनाताई गवळी यांनी आधीच दिला आहे. दरम्यान आता खासदार भावनाताई गवळी यांनी कळंब तालुक्यातील पिंपळशेंडा गावातील वाघाच्या हल्यात ठार झालेल्या नागराव जुनघरे यांच्या घरी भेट देऊन परीवाराचे सांत्वन केले. गावक-यांना सुध्दा धीर देत सोबत असलेल्या वन अधिका-यांना वाघाला तातडीने जेरबंद करण्याच्या सुचना दिल्या. या प्रकरणात लवकरच केन्द्रीय वनमंत्र्याला भेटून नागरीकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडणार असल्याची ग्वाही सुध्दा दिली. खासदार भावनाताई गवळी यांनी मार्गक्रमन करीत असतांना वाघग्रस्त भागात थांबून अनेक वाटसरुंशी संवाद साधला. त्यांच्या समस्या एैकून घेतल्या. या परीसरात सायंकाळ झाल्याबरोबर नागरीक आपआपल्या घराकडे वळत असल्याचे दिसून आले. शेतात सुध्दा जाण्याची हिम्मत होत नसल्याचे अनेक शेतक-यांनी सांगीतले. अशा भयग्रस्त परीस्थितीतून आमची सुटका करा असा टाहो अनेक शेतक-यांनी खासदार भावनाताई गवळी यांच्यासमोर फोडला. भावनाताई गवळी यांनी सुध्दा नागरीक तसेच शेतक-यांना धीर देत शिवसेना तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे तालुका प्रमुख दिगांबर म्हस्के, उप तालुका प्रमुख नाना धनफुले, पंचायत समिती सदस्य पुजाताई शेळके, विभाग प्रमुख योगेश मलोंडे, विभाग प्रमुख गुरुदेव राऊत, पांढरकवडा येथील एसीएफ तसेच आर एफ ओ उपस्थित होते.

  • तातडीने मदत द्या

वाघाच्या हल्यात ठार झालेल्या नागरीकांच्या परीवाराला शासनाकडून दहा लाख रुपयांची मदत दिली जाते. ही मदत तातडीने देण्याच्या सुचना खासदार भावनाताई गवळी यांनी वन अधिका-यांना दिल्या. याव्यतिरीक्त वाघग्रस्त भागातील शेतक-यांना अनुदानावर मचान, सोलर लाईट तसेच फेन्सींग ची व्यवस्था करुन देण्याची मागणी सुध्दा खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post