यवतमाळ :- अखिल भारतीय मारवाडी महिला मिडटाऊन शाखा यवतमाळच्या वतीने 31 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे 225 शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, शाळेचा गणवेश, कंपास, बिस्कीट आदिंचे वितरण नर्सरीपासुन सातव्या वर्गापर्यंत शिकणार्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी पंचायत समिती बाभुळगांव अशोक साठवणे, केंद्रप्रमुख दादा रामटेके, शाळा समिती सदस्य अनिल नागोसे शाळेचे मुख्याध्यापक व्ही. अ. गोडे, तसेच संस्थेच्या संस्थापिका सौ. पुनम जाजु , संस्थेच्या अध्यक्षा सौ. दिपा जोशी, सचिव ममता चांडक, कोषाध्यक्ष विमलेश मनक्षे, आदि मान्यवर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या जेष्ठ सदस्या सौ. संध्या अटल, सौ. सुनिता मुंधडा, सौ. रेखा गांधी, तसेच नायगाव येथील गणमान्य नागरीक याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
