मनसेच्या नेतृत्वात शेकडो ऑटो चालकांचा तहसीलवर मोर्चा..



  • ऑटो चालकांच्या विविध समस्यांविषयी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन . 


वणी(यवतमाळ) : शहरातील स्थानिक युवक आपल्या स्वाभिमानाने ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असतांना वाहतूक पोलीस विभागाच्या मनमानी कारभाराने त्यांना चांगल्याच आर्थिक, मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. यात या ऑटो चालकांना वाहतूक पोलीस विभागाकडून नियमबाह्य आर्थिक दंड,अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व जनतेसमोर मारहाण करून वेळोवेळी अपमानित करत असल्याने, अखेर या युवकांनी काल आपली समस्या घेऊन स्थानिक मनसे कार्यालयात मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांची भेट घेऊन आपली आपबीती सांगितल्या नंतर मनसे आपल्या पाठीशी आहे असा विश्वास दाखवला.

तसेच याविषयत शासनाकडून योग्य ती पावले उचलून आम्हा स्थानिक  युवकांना योग्य तो न्याय द्यावा या करिता आज मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांन्या व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली, यावेळी मनसेचे धनंजय त्रिंबके, वाहतूक सेनेचे आजिद शेख,धम्मादीप शंभरकर, लक्की सोमकुंवर, इरफान सिद्धकी, अमोल मसेवार, मयूर घटोळे, हिमांशू बोहरा, अनिकेत येसेकर, अक्षय मसेवार, हरीश तोडसाम, अशपाक खान, सादिक शेख, शकील खान आदींसह शहरातील शेकडो आटो चालक- मालक उपस्थित होते यावेळी आलेल्या युवकांनी राजुभाऊं सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले...

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post