इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- सारोळा येथील श्री मारूती सभागृहाच्या बांधकामासाठी स्थानिक आमदार निधीतून 10 लाख रूपयांचा निधी देणार असल्याची घोषणा व या गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आ़.सुजितसिंह ठाकूर यांनी दिले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे दहावी,बारावी व शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी,पालकांसह शिक्षकांचा व
तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनेतून सारोळा गावासाठी 90 लाख 26 हजार रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल आ.सुजितसिंह ठाकुर यांचा ग्रामस्थांच्यावतीने दि.3 सप्टेंबर रोजी यथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी आ.ठाकुर बोलत होते.
प्रारंभी शिंदेवाडी येथे तांडा वस्ती योजनेतंर्गत मंजूर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व सारोळा येथे तरूणांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक जिमचे लोकार्पण सोहळा आ़.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर दहावी व शिष्यवृत्ती परिक्षेत नेत्रदिपक यश पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थी,पालकांसह गुरूजणांचाही आ़.ठाकूर यांच्या हस्ते रोख रक्कम,पुष्पहार व शैक्षणिक साहित्य देवून सत्कार करण्यात आला़.यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता देवकर यांच्या वतीने उपअभियंता धाबेकर यांनी सत्कार स्विकारला.
यावेळी प्रमुख म्हणुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे,भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे,भाजयुमाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे,भाजपा नेते ॲड़.व्यंकटराव गुंड,दलितमित्र पांडूरंग कठारे,ॲड़ खंडेराव चौरे,जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू,ॲड़. नितीन भोसले,ज्येष्ठ नेते सुरेश देवगिरे,रमेश रणदिवे, सरपंच प्रशांत रणदिवे,उपसरपंच भाग्यश्री देवगिरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले,ज्योती देवगिरे, इंद्रजित देवकते,रिपाइंचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, तानाजी पाटील,शशी शिंदे,रंगनाथ शिंदे,अदि उपस्थित होते.
आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते गुणवंताचा व गुरुजनांचा सन्मान
- या गुणवंताचा सन्मान
अंकिता अविनाश जावळे, कुलदिप राजेंद्र सुतार, साक्षी सुधाकर देवगिरे,सलोनी चरणसिंग रजपुत, राम सौदागर बाकले,अभिषेक अरूण कुदळे,श्रावणी नरसिंग काळे,श्रध्दा श्रीनिवास देवगिरे,पल्लवी दत्तू कुदळे,सुदर्शन प्रल्हाद देवगिरे,सृष्टी मिलिंद कठारे, प्रथमेश महेश इसाके या गुणवंतांचा सत्काराने सन्मान करण्यात आला़.
- गुरूजणांचाही सन्मान
गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांचा सत्काराने सन्मान करण्यात आला़.जि.प.शाळेतील मुख्याध्यापक व्ही़.एऩ.कुदळे,श्रीमती भोज,एस़.जी़. सलगर,ए़.एस़.काकडे,एस़.आऱ.मस्के,एस़.बिसले,पी़. एल़.शेषाणी,आऱ.पी़.सुर्यवंशी,एस़.आऱ.भुतेकर,एस़.ए़. चौगुले यांचा सत्कार करण्यात आला़.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलिम शेख,राहूल कापसे,तुषार चव्हाण,बबलू रणदिवे,राजाभाऊ नांदे, समाधान काकडे,पांडूरंग रणदिवे,दत्ता बगाडे,शैलेश शिंदे,अदिंनी परिश्रम घेतले़.या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

