इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील धानुरी येथील शिवारातील स्वता: च्या शेतात हणमंत धनराज साळुंके (वय 20) या युवकाचा दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजायच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मारहाण करुन गळा दाबुन खुन केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस ठाण्याकडुन मिळालेली माहीती अशी कि,लोहारा तालुक्यातील धानुरी येथील हणमंत धनराज साळुंके रा.धानुरी (वय 20) हा दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजायच्या सुमारास स्वत:च्या शेताकडे विद्युत पंप चालु करण्यासाठी गेला होता.या युवकाचा अज्ञात कारणावरुन अज्ञात व्यक्तींनी मारहाण करुन गळा गोटुन खुन करुन मृतदेह शेतात मोटारीजवळ टाकले होते
.या घटनास्थळी पोलिस निरीक्षक सर्जेराव भंडारे यांनी भेट देवुन पंचनामा केला.व यानंतर घटनास्थळी उपविभागिय पोलिस अधिकारी आर.आर.धस यांनीही भेट दिली.याबाबत मयताचे वडील धनराज तानाजी साळुंके यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन पोलीस ठाण्यात दि. 3 सप्टेंबर रोजी रात्री साडे बारा वाजता अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आर.आर.धस यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सर्जेराव भंडारे हे करीत आहेत.
