इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- महिलाना व लहान मुलाना आजार पिण्याच्या पाण्यामुळे होत असुन हि बाब ज्ञान प्रबोधिनी हराळी या संस्थेने लक्षात घेवुन पाण्याच्या नमुण्याची तपासणी प्रयोगशालेत करुन लोकसहभागातुन सामाजिक भावना जपत फिल्टर पाण्याचे प्रकल्प सुरु करुन येथील नागरीकांची सोय केली आहे.असे प्रतिपादन आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले.
लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्यावतीने जेवळी येथील रुद्र्वाडी तांडा येथे लोकसहभ्गातुन 15 हजार लिटर पाण्याची फेरोसिमेंटची टाकी व ए.टी.एम.पाणी फिल्टर मशीनचे दि.2 सप्टेंबर रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी ते उदघाटन करुन बोलत होते.
यावेळी प्रमुख म्हणुन युवा नेते किरण गायकवाड, पं.स.सभापती ज्योतीताई पत्रिके,जि.प.माजी सदस्य दिपक जवलगे,सरपंच चंद्रकांत साखरे,शिवसेना तालुका प्रमुख तथा सरपंच मोहण पणुरे,ज्ञान प्रबोधीनी संस्थेचे केंद्र प्रमुख अभिजित दादा कापरे, शामसुंदर तोरकडे,भोजप्पा कारभारी,अँड.विश्वनाथ
पत्रिके,अदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन सुर्यवंशी यांनी केले.तर आभार शामसुंदर तोरकडे यांनी मानले.
या कार्यक्रमास महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
