लोहारा शहरात संजीवनी हॉस्पीटलचे उदघाटन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील गोरे कॉम्पलेक्स मध्ये संजिवनी हॉस्पीटलचे उदघाटन उमरगा,लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दि.2 सप्टेंबर रोजी करण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणुन युवा नेते किरण गायकवाड,
नगराध्यक्षा सौ.पोर्णिमा जगदिश लांडगे,जि.प.च्या समाज कल्याण सभापती चंद्रकला नारायणकर,डॉ.
शंकर भारती,अदि उपस्थित होते.
या हॉस्पीटलमध्ये सर्व लँब तपासण्या,बाल रुग्ण,
अंतरुग्ण सेवा,तज्ञ डॉ.ची भेट,दंत शल्यचिकीत्सा,अदि सुविधा रुग्णासांठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.


यावेळी आ.ज्ञानराज चौगुले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन नेताजी गोरे यांनी केले.तर आभार डॉ.शंकर भारती यांनी मानले.या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे,माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,नगरसेवक बाळासाहेब कोरे,रॉष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब हबीब शेख,भाजपा तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी,सुधीर घोडके,शिवा स्वामी,युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,विष्णु नारायणकर,जालींदर कोकणे,नगरसेवक आरीफ खाणापुरे,जगन पाटील,डॉ.गोविंद साठे,डॉ. सुनिल मंडले, डॉ.आर.एस.गायकवाड,डॉ.बी.जे.मेटे, नितीन जाधव, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post