सुगम गीत गायन स्पर्धेत अक्कलकोट येथील मयुर स्वामी याने प्रथम क्रंमाक मिळविला


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- द.भै.फ.दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय,बॅंक ऑफ़ महाराष्ट्रा आणि हिंदी विकास मंच सोलापुर यांच्यावतीने हिंदी दिनानिमित्य सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत अक्कलकोट येथील मयूर स्वामी याने प्रथम क्रमांक पटकविला आहे.

यावेळी दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते मयुर स्वामी यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख म्हणुन सोलापुर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ. इरेश स्वामी,बॅंक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक मृदुला जोगळेकर,हिंदी विभागप्रमुख प्रा.गंगाधर बिराजदार आदि उपस्थित होते.

               या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कीर्ती पांडे,संगीतालंकार शरणप्पा कलबुर्गी, डॉ.सुनील पाटील,प्रा.सुमित गाडेकर,प्रा.किशोर थोरे, प्रा.अमोल बोभडे,प्रा.शिवाजी राजगुरु,आकाश चव्हाण,अदिनी अभिनंदन केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post