कुरूम :- मुर्तिजापुर तालुक्यातील कुरूम ते नवसाळ रस्ता व त्या वरील ३ पुल पुरामुळे वाहून गेल्याने विद्यार्थ्यासह,शेतकरी,शेतमजूर, व गावकऱ्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
गत ११ जुलैला कुरूम व परिसरात चार दिवस झालेल्या सततधार पावसामुळे मोठया प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे परिसरातील नाले व शेत जमीन पाण्याखाली आली होती.यावेळी कवठा सोपीनाथ ते नवसाळकडे येणारा चाफेकडी नाल्याला आलेल्या पुरामुळे कुरूम ते नवसाळ रस्त्या व त्यावरील ३ पुल पाण्याने वाहून गेलाने कुरूम ते नवसाळ या दोन गावाचा संपर्क तुटल्याने याचा फटका कुरूम व नवसाळ येथील विद्यार्थी,शेतकरी शेतमजूर,गावकऱ्यांना बसला.
कुरूम येथे शाळा,विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कुरूमला येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करत होते.तसेच कुरूमला मोठी बाजारपेठ असल्यामुळे नवसाळ वासीयांचा कुरुमशी मोठ्या प्रमाणात संपर्क होता.कुरूमला येण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर,गावकऱ्यांसाठी जवळचा रस्ता म्हणून हाच एकमेव मार्ग होता.परंतु तो रस्ता व पूल वाहून गेल्याने शेतकरी,शेतमजुरांना शेतावर या रस्त्याने जाणे येणे कठीण झाले आहे तसेच आता सोयाबीन पीक काढणीचा हंगाम सुरु झाल्याने आपल्या शेतातील माल घरी आणणे बैलबंडी व चारचाकीने सुद्धा कठीण झाले आहे.
परिणामी दुसरा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे परंतु तो लांब व खिशाला झळ देणारा असल्यामुळे परवडन्या जोगा नाही व मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे व त्यात महामार्गाचे काम सुरू असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे सुद्धा पडले आहे.त्यामुळे रोज अपघात घडत आहे. अशातच विद्यार्थी कुरूम येथे शिक्षणासाठी आपला जिव मुठीत धरून महामार्गाने सायकलने प्रवास करतात.यामुळे विद्यार्थी,शेतकरी,शेतमजूर,गावकरी त्रस्त झाले आहे.
संबंधित विभागाने वाहून गेलेला कुरूम ते नवसाळ रस्ता व त्यावरील पुलाची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थी,शेतकरी,शेतमजूर,गावकऱ्यांनी केली आहे.
रस्ता व त्यावरील पुल वाहून गेल्याने शाळेत जाण्यासाठी आम्हा ग्रामीण विद्यार्थ्यांना रस्ता नसल्यामुळे पर्यायी आम्हाला राष्ट्रीय महामार्गाने जावे लागते.
भरधाव वेगाने वाहन जातात त्यामुळे एखादा अपघात होऊ शक्यतो हे टाळण्यासाठी रस्त्याचे काम लवकर करण्यात यावे पायल अ. बोरकर विद्यार्थीनी नवसाळ
"शेतकऱ्यांना,शेतमजूरांना जाण्यासाठी रस्ता नाही,आता शेतातील शेतमाल निघणार असून बैलबंडी व ट्रॅकटरने शेतातील पीक (शेतमाल)घरी आणण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे व परतीचा मान्सूनचा पाऊस आल्यास आमच्या समोर प्रश्न उभा ठाकला आहे. अ. सादिक अ. हमीद
शेतकर कुरूम


