विज अंगावर पडल्याने चार शेतमजुर महिला गंभीर जख्मी कास्ती खु येथील शिवारात घटना घडली


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील कास्ती (खुर्द) शिवारात दि.29 सप्टेंबर रोजी अगावर विज पडल्याने चार शेतमजुर महिला गंभीर जख्मी झाल्या आहेत.या जखमी महिलांना लोहारा ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथेपुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

   लोहारा तालुक्यातील कास्ती (खुर्द) शिवारात दगडू साळुंके यांच्या शेतातील सोयाबिन पिकाची काढणी सुरू आहे.सोयाबीन काढत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास मेघ गर्जनेसह अचानक पाऊसास सुरवात झाली.पाऊस जोराचा असल्याने सर्व महिला मजूर शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आश्रयाला गेल्या होत्या.

तेथेच काही क्षण थांबल्या असतानाच पत्र्याच्या शेड्वर वीज कोसळी.यामध्येकास्ती (खुर्द) येथील सपना राम साळुंके (वय 25), चंद्रकला दगडू साळुंके (वय 30),लक्ष्मी तिम्मा माने (वय 25),लक्ष्मी राजू दंडगुले,या जखमी झाल्या आहेत.वीज कोसळून जखमी झाल्याचे पाहून तेथेच काम करणाऱ्या मजूरांनी गावातील नागरिकांना या घटनेची माहिती दिली.जखमी महिलांना शेतातून बैलगाडीत गावत आणले.त्यानंतर तात्काळ रूग्णवाहीका मागवून लोहारा शहरातील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.या जख्मींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबद येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post