भुषण महाजन
रावेर प्रतिनिधी :- रावेर तालुक्याच्या भोकरी के-हाळा रस्त्याचा,चांगला च बट्याबोळ झाला आहे या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खड्डे दिवसेंदिवस मोठे होत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यांना पावसाच्या पाण्याने तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. भोकरी, के-हाळा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असते.या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. तसेच या रस्त्यांवरून नेहमी अवजड वाहनांचा वापर होत असतो. अशा या वर्दळीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यातून वाहने काढतांना वाहनधारकांना अडचणी निर्माण होत असतात.या रस्त्या कडे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष दिसून येत असून लोकप्रतिनिधींना याबाबत कोणतीही गरज नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत काही सत्ताधारी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते की, सदर रस्त्याच्या कामाबाबत लोकप्रतिनिधी ना सुचना.दिल्या आहे ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडे उपस्थित होत आहे.भोकरी
के-हाळा रस्त्यावरील खड्ड्यांची दुरूस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. परंतु, सार्वजनिक विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. खड्ड्यामय रस्त्यांवरून गाडी चालवत नेल्याने वाहनधारकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आल्याने नागरिकांच्या जीवताशी खेळले जात असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
- रस्त्यांवर होते कोंडी
