इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी:- गोविंदा आला रे आला च्या जयघोषात लोहारा शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेली दही हांडी दि.3 सप्टेंबर रोजी सायकांळी साडे सात वाजता फोडण्यात आली. यावेळी लोहारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेले पंधरा वर्षापासून शहरातील शिवनगर येथे शिव मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दही हांडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याही वर्षी दही हंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.ही दहिहंडी फोडण्यासाठी युवकांनी चार मानवी मनोरे तयार केले होते.यात श्रीकृष्ण वेशभूषा परिधान केलेल्या सुरज क्षीरसागर यांनी दहिहंडी फोडली.यावेळी नगरसेवक श्रीनिवास माळी,अमोल बिराजदार,राजेंद्र माळी,शरण माळी,बजरंग माळी, राम चपळे,ज्ञानेश्वर माळी,गोट्या मुळे,अनिल यल्लोरे,महेश पाटील,महेश बिराजदार,इरशाद तळणीवाले,ओंमकार,बिराजदारअंकुश चपळे आदींनी तरुण या मानवी मनोऱ्याच्या संघात सहभागी झाले होते.यावेळी यांच्यासह शहरातील अनेक तरुण उपस्थित होते.बाल गोपाळांसह महिलांनी यावेळी दहिहंडी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बालगोपालसह महीलांनी गर्दी केली होती.
SHARE THIS