इकबाल मुल्ला
उमरगा,लोहारा :- उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व जनतेस कळविण्यात येते की,दि.01.09.2018 रोजी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात अली आहे..
सदर प्रारुप यादीमध्ये उमरगा,लोहारा तालुक्यातील BLO कडुन वेळोवेळी प्राप्त झालेले विविध फाॅर्मस (नाव समाविष्ट करणे,वगळणे,दुरुस्ती, स्थलांतर) तसेच रंगीत फोटो अपलोड करणे,दुबार नावे असणारे मतदारांची माहिती,कायम स्थलांतरित मतदारांची माहिती,मयत मतदारांची माहिती इ.आधारे आवश्यक कार्यवाही तहसील कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.त्यामुळे बरीच नावे समाविष्ट झाली/वगळली गेली आहेत.
दि.01.09.2018 रोजी प्रसिद्ध झालेली सदर मतदार यादी येत्या लोकसभा तसेच इतर निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.
तसेच सदर मतदार यादीनुसार तालुक्यातील मतदारांचे पुरुष-स्ञी गुणोत्तर विषम आहे...त्यामुळे कुटुंबातील सर्व पाञ महिलांची नावे मतदार यादीत नोंदवली जातील याची कृपया विशेष काळजी घ्यावी.
तसेच सदर प्रारुप मतदार यादीचे अनुषंगाने असणारे सर्व प्रकारचे आक्षेप दि.31.10.2018 पर्यंत संबंधित BLO यांचेकडे तसेच तहसील कार्यालयात लेखी नोंदवावेत असे अवाहान मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले (उमरगा/लोहारा) यांनी केले आहे.
