सारोळा येथे सोमवारी व्यायाम शाळा लोकार्पण,रस्ता कामाचा शुभारंभ, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ 90 लाख 29 हजार निधीची पाणीपुरवठा योजना मंजुरीबद्दल अधिकाऱ्यांचा करणार सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) व शिंदेवाडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे दि.3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा़जता आयोजन करण्यात आले आहे़.या कामाचा शुभारंभ व लोकार्पण भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ़.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे़.सारोळा येथे तरूणांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक जिमचे उदघाटन, दहावी व शिष्यवृत्ती परिक्षेत नेत्रदिपक यश पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात  येणार आहे़.तसेच शिंदेवाडी येथे तांडा वस्ती योजनेतंर्गत मंजूर सिमेंट काँक्रीट रस्ताकामाचा शुभारंभही आ़.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे़.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी तर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, अ‍ॅड़.मिलिंद पाटील,सुधीर पाटील,अ‍ॅड़.व्यंकटराव गुंड,अ‍ॅड़.खंडेराव चौरे,अ‍ॅड़.अनिल काळे,अ‍ॅड़.नितीन भोसले,भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, पं.स.सदस्य गजेंद्र जाधव,ज्येष्ठ नेते सुरेश देवगिरे, रमेश रणदिवे,रामकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण देवगिरे,सचिव सोपान कोल्हे,दलितमित्र पांडूरंग कठारे,रिपाइंचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़.
या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सरपंच प्रशांत रणदिवे,उपसरपंच भाग्यश्री देवगिरे,ग्रा.पं.सदस्य विनोद बाकले,नितीन पाटील,सुजित बाकले,खंडू शिंदे,कलिम शेख,राहूल कापसे,प्रदीप वाघ,बबलू रणदिवे,नितीन टिंगरे,राहूल देवगिरे,सुदीप देवगिरे व भाजपा शाखेच्या वतीने   करण्यात आले आहे.
सारोळा गावासाठी 90 लाख 29 हजार रुपये निधीची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार व पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता दशरथ देवकर यांचा आ़.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे़.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post